दापोली-मंदिर संस्कृती रक्षणासाठी संघटन आवश्यक

दापोली-मंदिर संस्कृती रक्षणासाठी संघटन आवश्यक
Published on

rat19p45.jpg-
46360
दापोली ः पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत बोलताना महाराष्ट्रातील महासंघाचे दापोली तालुका संयोजक रमेश कडू.
-----------

मंदिर संस्कृती रक्षणासाठी संघटन आवश्यक
रमेश कडू ; दापोली पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्तांची बैठक
दापोली, ता. १९ ः मंदिर संस्कृतीरक्षण आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील महासंघाचे दापोली तालुका संयोजक रमेश कडू यांनी केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने दापोली तालुक्यातील कड्यावरील श्री गणपती मंदिर येथे पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्तांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. मंदिरे हिंदू धर्माची आधारशिला आहेत. हिंदूंसाठी ऊर्जास्रोत आहेत. म्हणून मंदिर संस्कृतीचे रक्षण, परंपरांचे रक्षण, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य सुरू आहे. या दृष्टीने मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिराच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे या सुत्राने महासंघ कार्य करत आहे. यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे, असे महासंघाचे दापोली तालुका संयोजक रमेश कडू यांनी केले. बैठकीत मंदिरांच्या समस्यांविषयी चर्चा झाली आणि आज अशा संघटनेची आवश्यकता आहे. आम्ही महासंघाला जोडून सहकार्य करू, असे मनोगत विश्वस्तांनी व्यक्त केले.
मंदिरांच्या जमिनी आणि देवरहाटी यातील निधर्मी शासनाचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी मंदिरांचे प्रभावी संघटन होणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दापोली तालुका संयोजक सुरेश रेवाळे यांनी सांगितले. या वेळी कड्यावरील गणपती मंदिरचे अध्यक्ष सुरेश महादलेकर, कार्याध्यक्ष विध्वांस, हिंदू जनजागृती समितीचे परेश गुजराथी आणि चंद्रकांत उजाळ, ग्रामदैवत श्री काळभैरवचे अध्यक्ष संतोष गुरव यांच्यासह श्रीराम मंदिर, दत्तमंदिर, इळणे, वाघिवणे, माळवी, बोरथळ आदी २५ देवस्थानचे ५० विश्वस्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com