रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

Published on

गणपतीपुळ्यात सांगलीतील
तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आलेला चालक अचानक बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सचिन बबन कापसे (वय ३८, रा. जत, ता. जत, जि. सांगली) असे मृत तरुण चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
............
विजापूरच्या तरुणाची
धारतळे येथे आत्महत्या
रत्नागिरीः विजापूर (राज्य कर्नाटक) येथील तरुणाने धारतळे (ता. राजापूर) येथील काजूच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. नाटे सागरी सुरक्षा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मल्लाप्पा तेवरेट्टी (वय २६, रा. अरकेरी शिद्दापूर, ता. तिकोटा, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास धारतळे-नाटे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या पाठीमागे निदर्शनास आली.
----
बागेत कामगाराने
मोबाईल चोरला
रत्नागिरी ः आंबाबागेच्या कामासाठी आलेल्या नेपाळच्या कामगाराने २४ हजाराचा मोबाईल चोरला. राजापूर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवेक चौधरी (वय ३०, रा. नेपाळ, सध्या रा. खिणगीणी, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) रात्री अडीचच्या सुमारास खिणगीणी येथे फिर्यादी यांच्या घरी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल विजय सरफरे (वय ३५, रा. सरफरेवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) यांच्या आंबाबागेत कामासाठी संशयित नेपाळी विवेक चौधरी होता. त्याने सरफरे यांचा २४ हजाराचा मोबाईल पळवला.
.......
सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधून
दागिन्यांची चोरी
खेडः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसमधून (सिंधुदुर्ग एक्स्प्रेस) एका महिलेच्या १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या पाटल्या अनोळखी चोरट्याने लांबवल्याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वेस्टेशन ते दिवाण खवटी या रेल्वेच्या प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी शिला पांडुरंग थरवळ (वय ६८, रा. विन्हेरे, ता. महाड, जि. रायगड) यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली आहे. थरवळ या सावंतवाडी दिवा (सिंधुदुर्ग एक्स्प्रेस)ने त्यांचे पती व इतर नातेवाईक यांच्यासोबत खेड ते विन्हेरे असा रेल्वेप्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या पाटल्या चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com