चिपळूण-कोळसा भट्ट्या लावलेल्या जागामालकांचा शोध सुरूच

चिपळूण-कोळसा भट्ट्या लावलेल्या जागामालकांचा शोध सुरूच

Published on

कोळसा भट्ट्या लावलेल्या
जागामालकांचा शोध सुरूच
वनविभागाकडून अद्याप गुन्हा नाहीच ; चौकशी सुरू असल्याची माहिती
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील कळवंडे येथे वनविभागाने कोळसा भट्ट्या उद्ध्वस्त केल्या असल्या, तरी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणी जागामालक आणि संबंधितांचा शोध घेतला जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वनविभागाकडून कोळसा भट्टीला परवानगी दिली जात नाही. तसेच न्यायालयानेही कोळसा भट्टीवर बंदी घातली आहे. तरीही गेल्या काही वर्षांत टेरव येथे कोळसा भट्ट्या धगधगत असल्याचे उघड झाले होते. टेरवमधील कोळसा भट्टी व्यावसायिकांवर अनेकदा कारवाईदेखील झाली; मात्र तरीही यावर्षी कोळसा भट्ट्या सुरूच राहिल्या होत्या. यावरून टेरव ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. कोळसा भट्टी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर वनविभागाने टेरव येथे धाडी टाकून कारवाई केल्या, संबंधितांवर गुन्हेदेखील दाखल केले. टेरव येथील कोळसा भट्टीचा सिलसिला बंद झाल्यानंतर कळवंडे येथे त्या धगधगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. कळवंडे माडवाडीत एकूण १२ भट्ट्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केल्या. माडवाडीतील डोंगरावर या भट्ट्या लावल्याचे उघड झाले होते; मात्र अद्याप या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. भट्ट्या कोणाच्या जागेत लावण्यात आल्या, लाकूडसाठा कोठून करण्यात आला, वृक्षतोडीला वनविभागाची मान्यता होती का, आदी विविध बाबींची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. केवळ चौकशी सुरू असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाकडून दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com