

-ratchl२०३.jpg-
P२५N४६५७१
चिपळूण ः श्रीमंत कोकाटे यांचा सत्कार करताना सुबोध सावंतदेसाई.
----
छत्रपती शिवरायांनी जनतेच्या हितासाठी राज्य केले
डॉ. श्रीमंत कोकाटे ः चिपळुणात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी राज्य केले. त्यामुळे असा राजा जगात होणे नाही, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी येथे केले.
चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शिवजयंतीनिमित्ताने हे व्याख्यान झाले. या वेळी आमदार भास्कर जाधव, मुख्याधिकारी विशाल भोसले, उद्योजक प्रकाश देशमुख, सतीश कदम, सुबोध सावंतदेसाई, संतोष सावंतदेसाई आदी उपस्थित होते. डॉ. कोकाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जगाच्या इतिहासात सापडणार नाही. शिवाजी महाराज हे क्रांतीचे प्ररेणास्रोत आहेत, ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या इतिहासातून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील इतकेच काय देश-परदेशातील काही इंग्रज राज्यकर्ते, अधिकारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेतल्याची नोंद आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण म्हणजे ते रयतेचे राजे होते. त्यांनी आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी चालविले. त्यामुळेच त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.