जयगड किल्ल्याची स्वच्छता

जयगड किल्ल्याची स्वच्छता

Published on

rat२३p१३.jpg-
२५N४७१२७
रत्नागिरी : राजा शिवछत्रपती परिवारातर्फे किल्ले जयगड येथे सफाई अभियान राबवताना मावळे.
rat२३p१५.jpg-
२५N४७१२९
रत्नागिरी : कळझोंडी ग्रामस्थांनी किल्ले जयगड सफाई मोहिमेत भाग घेतला.
rat२३p१७.jpg-
------
रत्नागिरीतील जयगड किल्ल्याची स्वच्छता
राजा शिवछत्रपती परिवाराचा पुढाकार ; ५६ मावळे, रणरागिणींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : राजा शिवछत्रपती परिवारातर्फे (महाराष्ट्र) रत्नागिरी तालुक्यातील जयगडा किल्ला येथे सफाई मोहीम राबवण्यात आली. ५६ मावळे, रणरागिणींनी यामध्ये सहभागी झाले होते. किल्ल्यावरील बुरुजावर वाढलेली झाडी, झुडपे, गवत साफ केले. या मोहीमेमुळे किल्ले जयगडवर नीटपणे फिरता येऊ लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. गड किल्ले, बांधले, देखभाल केली. आज साडेतीनशे वर्षांचा हा जाज्वल्य इतिहास आपल्याला गडांच्या माध्यमातून प्रेरणा देतो. परंतु सध्या किल्ले, गडांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते. त्यामुळे राजा शिवछत्रपती परिवारातर्फे दर महिन्याला सफाई मोहीम व रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमांना मदत असे अन्य उपक्रम राबवले जातात. वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि बालगृहाला दिवाळी फराळ वाटप आणि मुलांना उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले आहे. किल्ले जयगडवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३१ मावळे, ८ बाल मावळे, १२ रणरागिणी आणि ५ बाल रणरागिणी असे एकूण ५६ जणं सहभागी झालेले होते. कळझोंडी ग्रामस्थांनीसुद्धा या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत सफाईला हातभार लावला. रत्नागिरीमध्ये गेली आठ वर्षे परिवार काम करत असून जयगड येथे २०१६ पासून स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य चालू आहे. रत्नागिरी परिवाराने आजपर्यंत जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, नाटे येथील घेरा यशवंतगड, आंबोळगड, चिपळूणचा गोविंदगड, दापोली येथील सुवर्णदुर्ग अशा विविध ठिकाणी गडसंवर्धन मोहीमेचे यशस्वी आयोजन केले आहे. संगमेश्वर येथील पांडवकालीन पुरातन मंदिरे स्वच्छता मोहीमसुध्दा आयोजित केली होती. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. गड संवर्धन आणि शिवकार्य करण्यासाठी कोणाची इच्छा असेल तर रत्नागिरी विभाग प्रमुख दिनेश कुरटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी परिवारामार्फत करण्यात आले.
---
आठ वर्षे संवर्धनाचे काम
राजा शिवछत्रपती परिवार स्थापना ३१ जुलै २०१४ रोजी झाली. संस्था नोंदणीकृत असून सांगलीचे सुनिल सुर्यवंशी संस्थापक आणि अध्यक्ष आशिष घोरपडे आहेत. दर महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक विभागामार्फत २१ ठिकाणी गड संवर्धनाचे कार्य चालू असते. राजा शिवछत्रपती परिवाराचे महाराष्ट्रात ३२ जिल्ह्यांत मिळून २१ विभागांमध्ये कार्यरत आहे. गडसंवर्धनाचे काम स्वखर्चाने केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com