अल्पसंख्यांक बहुल शाळा महाविद्यालयांना अनुदान

अल्पसंख्यांक बहुल शाळा महाविद्यालयांना अनुदान

Published on

अल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गवाणकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर पालिका शाळा व अपंग शाळा यांच्याकडून १२ पायाभूत सोयीसुविधा व शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, अशा सुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल १० लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. संबंधित शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती विभागाकडे सादर करावयाचे आहेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com