दूर्वांकने सोडवली आठ मिनिटांत १५० गणिते

दूर्वांकने सोडवली आठ मिनिटांत १५० गणिते
Published on

-rat२४p२८.jpg-
P२५N४७४३८
दूर्वांक पवार, प्रसेनजित कांबळे
----
दूर्वांक, प्रसेनजितने सोडवली आठ मिनिटांत १५० गणिते
ऑनलाईन ॲबॅकस स्पर्धा; विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : स्मार्टअस नॅशनल लेवल ऑनलाईन अॅबॅकस स्पर्धेमध्ये कुवारबाव येथील स्मार्टअस अॅबॅकस क्लासेस रत्नागिरी सेंटरच्या दूर्वांक दर्शन पवार याने अ श्रेणीत व प्रसेनजीत सचिन कांबळे याने इ-श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला. अवघ्या ८ मिनिटांत दोन्ही विद्यार्थ्यांनी १५० पैकी १५० गणिते सोडवली.
‘स्मार्टअस एक्झाम्स’ या ऑनलाईन अॅप्लिकेशनचा वापर करून एकाचवेळी महाराष्ट्रासह १२ राज्यांत व दोन केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. दूर्वांक व प्रसेनजित यांना स्मार्टअस अॅबॅकस क्लासेसच्या कुवारबाव सेंटरच्या संचालिका तथा शिक्षिकांचे मार्गदर्शन मिळाले. बक्षीस वितरण पुण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झाले. या वेळी संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र शेलार, स्मिता शेलार यांच्यासह प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी सिनेतारका गौतमी देशपांडे आणि युवाशक्ती फाउंडेशनचे संचालक सतीश पवार उपस्थित होते.
एकूण ५ ग्रेडमध्ये विभागलेल्या या परीक्षेत पहिल्या ४ ग्रेडमधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आणि ५व्या ग्रेडमधील द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सायकल बक्षीस देण्यात आली. ५व्या ग्रेडमधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला लॅपटॉप बक्षीस देण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी, मेडल्स तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी सर्वांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com