पोलीसदलाच्या ताफ्यात 949 वाहनांसह 14 ई-बाईक
-rat२४p१७.jpg-
२५N४७३९९
धनंजय कुलकर्णी
----
पोलिस दलाच्या ताफ्यात ९४९ वाहने
धनंजय कुलकर्णी ः जलद घटनास्थळी पोहचणे शक्य
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्हा पोलिसदलाला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजेची वाहने मिळाली आहेत. त्यामुळे पोलिसदलाच्या ताफ्यात ९४९ वाहने झाली असून, दल मजबूत झाले आहे. वाहनांकडून पोलिसदलाची गरज भागली नसली तरी आता पुरेशी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही काही घटना घडली तर जलद गतीने पोलिस घटनास्थळावर पोहचण्याचे एवढे गतिमान पोलिसदल झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
अत्याधुनिकतेची कास धरलेल्या या पोलिस दलाला जिल्ह्यात विविध घटना घडल्या की, तत्काळ घटनास्थळावर पोहचणे आवश्यक असते. त्यासाठी वाहनांची गरज असते. अनेकवेळा वाहनांच्या कमतरतेमुळे वेळेत घटनास्थळी पोहचता येत नाही. त्यामुळे वाहनांची मागणी करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजनमधून सुमारे १४० वाहने पोलिसदलाला दिली आहेत. त्यामुळे पोलिसदलाला गस्त, तातडीची गरज, अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपेक्षित वाहने, शीघ्र कृतीदल, मोठी वाहने उपलब्ध झाली आहेत. पोलिसदलाची सुमारे ८०९ आणि जिल्हा नियोजनची मिळून ९४९ वाहने पोलिसदलाच्या ताफ्यात आहेत. दुचाकी, थार, योद्धा, दोन दंगा नियंत्रण पथक ३५ कर्मचाऱ्यांसाठी २ मोठ्या बस, बोलेरो, ई-बाईक आदी वाहने मिळाली आहेत. त्यामळे सुलभता येणार असून गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी वाहनांची मदत होणार असून दलाची गती वाढली आहे.
---
जिल्हा नियोजनमधून मिळालेली वाहने
सन* चारचाकी* दुचाकी
२०२२-२३* १४* २०
२०२३-२४*११* ००
२०२४-२५*१०*१४ (ई बाईक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

