निरंकारी सेवादलामार्फत देवगड किनारी स्वच्छता
47579
निरंकारी सेवादलामार्फत
देवगड किनारी स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ः निरंकारी मिशनच्या अमृत प्रोजेक्ट अंतर्गत ''स्वच्छ जल, स्वच्छ मन'' या अभियानातंर्गत येथील समुद्र किनारची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक सहभागी झाले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रेरणेतून या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
पूर्वीप्रमाणेच याहीवर्षी ‘चला सावरू, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला व्यापक स्वरुप देण्यात आले. येथील समुद्रकिनारची स्वच्छता करून कचरा वर्गीकरण करण्यात आला. गोळा केलेला कचरा पिशव्यांमध्ये जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे कर्मचारीही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

