जयवंत दळवींच्या साहित्याचा जागर

जयवंत दळवींच्या साहित्याचा जागर

Published on

47574

जयवंत दळवींच्या साहित्याचा जागर

टांक प्रशालेत उपक्रम; पुस्तक वाचनास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः थोर साहित्यिक जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे शाळांमधून दळवींच्या साहित्याचा प्रसार करण्याचे ठरले आहे. त्यानुसार प्रथमतः आरवली-टाक येथील सरस्वती विद्यालयामध्ये दळवींच्या साहित्याचा जागर करण्यात आला.
कट्ट्यातर्फे विनय सौदागर व दिलीप पांढरे उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. दळवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विनय सौदागर यांनी दळवींच्या साहित्याचा आढावा घेतला. मुलांना आवडणाऱ्या अशा ‘सारे प्रवासी घडीचे’ या पुस्तकातील काही उतारे त्यांनी वाचून दाखविले. ‘सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमावेळी मुलांच्या समूहनृत्यात झालेली धमाल’, नरूने लिहिलेला ‘शिवाजी महाराजांचे बालपण’ हा निबंध आदी उतारे वाचल्यामुळे मुले भारावली. दिलीप पांढरे यांच्या हस्ते शाळेला ‘सारे प्रवासी घडीचे’ हे दळवींचे पुस्तक भेट देण्यात आले. मुलांना त्या पुस्तकाचे परीक्षण लिहिण्याचे आवाहन करण्यात आले. उत्तम परीक्षण लिहिणाऱ्या तीन मुलांना हे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. संस्थेचे पदाधिकारी प्रमोद कावळे यांच्या हस्ते विनय सौदागर यांचा सत्कार केला. देवयानी झोरे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एम. हरगुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com