कुडाळमध्ये विविध कामांना ठाकरे शिवसेनेमार्फत प्रारंभ

कुडाळमध्ये विविध कामांना ठाकरे शिवसेनेमार्फत प्रारंभ

Published on

47575

कुडाळमध्ये विविध कामांना
ठाकरे शिवसेनेमार्फत प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नातून शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी, अभिनवनगरमध्ये विविध विकासकामे मंजूर केली आहेत. माजी आमदार नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नगरसेवक शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी नगरसेविका मेघा सुकी, अमित राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.
विकासकामांमध्ये अभिनवनगर पारिजात कॉम्लेक्स येथे जाणाऱ्या वाटेवर काँक्रिटीकरण करणे, अभिनवनगर येथे पारिजात कॉम्लेक्स ते गवंडे घरापर्यंत गटार बांधणे, विठ्ठलवाडी साळवी घर ते आरोलकर घरापर्यंत गटार बांधणे, विठ्ठलवाडी मुख्य नाला उर्वरित काम पूर्ण करणे, विठ्ठलवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे (टप्पा पहिला), अभिनवनगरमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे, विविध ठिकाणी पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे या कामांचा प्रारंभ करण्यात आला. त्याबद्दल ग्रामस्थांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com