भारताच्या विजयाबाबत आम्हाला अभिमान
47584
भारताच्या विजयाबाबत आम्हाला अभिमान
मुस्लिम बांधव ः मालवणातील परप्रांतीयांच्या कृत्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ ः भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान भारत देशाविरोधात घोषणा देणाऱ्या परप्रांतीयाचा शहरातील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदनही दिले. शिवाय रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयाचा आम्हाला अभिमान आहे, असेही मालवणातील मुस्लिम समाजाने सांगितले.
सुन्नत जामतुल मुस्लिमीन मालवण संस्थेच्यावतीने मालवणातील स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी हसरत खान, जाबीर खान, सलीम खान, बखतीयार खान, बशीर अथनीकर, मुस्ताक अथनीकर, नदीम मुजावर, बाबा मुकादम, फारूक मुकादम, सिद्धिक पटेल, सलाम मुजावर, सरदार ताजर, ईमू मुजावर, कैसर पठाण आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ‘‘देश विरोधी भूमिका घेणाऱ्या अशा परप्रांतीयांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. स्थानिक रहिवाशी मुस्लिम समाज व हिंदू समाज एक दिलाने राहत आहे. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. परंतु, काही दिवसांपासून काही परप्रांतीय मुस्लिम व्यक्ती मालवणमध्ये येऊन समाजाला गालबोट लावण्याचे कृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परप्रांतीयांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. जेणेकरून असे कृत्य करण्याची हिंमत दुसऱ्या व्यक्तीची होणार नाही. आम्ही मालवणवासी मुस्लिम समाज देशप्रेमी आहोत आणि देशप्रेमीच राहणार.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

