चिपळूण-वाळू नसल्याने घरकुल लाभार्थी हवालदिल

चिपळूण-वाळू नसल्याने घरकुल लाभार्थी हवालदिल

Published on

वाळू उपलब्ध नसल्याने
घरकुल लाभार्थी हवालदिल
भरत लब्धे ; निविदा प्रक्रिया रखडली
चिपळूण, ता. २५ः प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात १९ हजार ३०८ घरकुलांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांना त्या त्या ग्रामपंचायतीकडून घरांचे बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. या लाभार्थ्यांनी १२० दिवसात घरकुल बांधून पूर्ण करण्याची अट घातली आहे. त्यातच घराच्या बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध होत नाही. परिणामी, घरांची कामे रखडलेली आहेत. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती प्रक्रिया राबवून सर्वसामान्यांसाठी वाळूची उपलब्धता करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली आहे.
गतवर्षी महसूल विभागाकडून गेल्या वर्षांपासून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू पुरवली होती; मात्र आता हेच लाभार्थी मोफत वाळूसाठी चकरा मारत आहेत. गतवर्षीही घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी यासाठी पाठपुरावा केल्यानंतरच लाभार्थ्यांना वाळू मिळाली होती. वाळूची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जिल्हाभरात वाळूचा तुटवडा भासत आहे. वास्तविक पावसाळ्यानंतर महसूल विभागाच्या खनिकर्म विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होते; परंतू यावर्षी ही प्रक्रिया न झाल्याने जिल्ह्यातील बांधकामे ठप्प झाली आहेत. शासकीय व खासगी बांधकामांना मोठा फटका बसला आहे. स्वखर्चाने घरे बांधणारे अडचणीत आले आहेत. त्यांना चोरटी वाळू चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. यातून शासनाचा करोडो रुपये महसूलही बुडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांचा तातडीने विचार करावा व लवकरात लवकर जिल्ह्यात वाळू उपलब्ध करावी आणि सर्वांना दिलासा द्यावा. पालकमंत्री, खासदार, जिल्ह्यातील आमदारांनीही या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com