साहित्य संमेलन चिपळूणला व्हावे
साहित्य संमेलन
चिपळूणला व्हावे
चिपळूणः पुढील वर्षी होणारे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान चिपळूणला मिळावा, अशी मागणी येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने केली आहे. दिल्ली येथे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. पुढच्या वर्षी ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. त्यासाठी इचलकरंजी, औदुंबर, चिपळूण आणि शाहूपुरी आणि सातारा शाखा येथून निमंत्रणे आली आहेत. ३१ मार्चपर्यंत इच्छुकांना निमंत्रण पाठवता येईल, असे महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले आहे. चिपळूणला यापूर्वी ८६वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते. येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने हे संमेलन यशस्वीरित्या भरवले होते. त्यानंतर ९९वे साहित्य संमेलन चिपळूणला भरवण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालय आग्रही आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक यांनी महामंडळाला पत्र दिले आहे.
----------
गांधारेश्वर मंदिरात
आज शिवरात्र उत्सव
चिपळूण : येथील जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टअंतर्गत श्री क्षेत्र गांधारेश्वर शिवमंदिरात बुधवारी (ता. २६ ) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले आहे. महाशिवरात्री दिनी श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भाविकांसाठी अभिषेक व दर्शनासाठी खुले राहील. या निमित्त श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिरात पहाटे ६ वाजता अभिषेक, १० ते १२ श्री अनिरूद्ध उपासना केंद्र चिपळूण यांची महाशिवरात्र विशेष उपासना, सायं. ७ वाजता वारकरी सांप्रदायाचा हरिपाठ आणि दिवसभर श्रींचा दर्शन सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
---------
नगरपालिकेच्या शिबिरात
६५ जणांचे रक्तदान
चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालिकेने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. १२८ जणांनी नोंदणी केली होती; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरितांना रक्तदान करता आले नाही तसेच शिवजन्म पोवाडा, छावा महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रमही हाऊसफुल्ल झाला. सकाळी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डेरवण रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर कोल्हापूर येथील शिवशाहीर रंगराव पाटील यांचा शिवजन्म पोवाडा सादर झाला तसेच सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मोकळ्या जागेत स्वरांजली ग्रुप प्रस्तुत छावा महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

