रत्नागिरी शहरात महिलांना मोफत स्वच्छतागृह हवे

रत्नागिरी शहरात महिलांना मोफत स्वच्छतागृह हवे

Published on

rat25p17.jpg
47594
रत्नागिरीः मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा करताना मनसैनिक.
---------
शहरात महिलांसाठी हवे मोफत स्वच्छतागृह
मनसेची मागणी; भाजीविक्री करणाऱ्या महिलांना करा शुल्क माफी
सकाळवृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ः रत्नागिरी शहरांत महिलांसाठी एकही स्वच्छतागृह मोफत नाही आहे. मुळात स्वच्छतागृहच अत्यल्प आहेत आणि जी काही मोजकी आहेत त्यामध्ये शुल्क आकारले जाते. पुरुषांना मोफत आणि महिलांना सशुल्क असा भेदभाव का? असा सवाल मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.
दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहराध्यक्ष बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनखाली शहर महिला आघाडीमार्फत मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेत शहरात महिलांना होणाऱ्या गैरसोयीचा पाढा वाचला.
भाजी किंवा आंबेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून पालिका २० ते ६० रुपये शुल्क आकारते. हे शुल्क माफ करावे व या महिलांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. रामआळीमधील स्वच्छतागृहात शुल्क घेऊनही भाजीविक्री करणाऱ्या महिलांवर तेथील कर्मचारी अरेरावी करत असल्याची तक्रार महिलांनी मनसेकडे केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रत्नागिरी शहरात ग्रामीण भागातून अनेक महिलांना रोजगार नाही म्हणून रस्त्यावर बसून भाजी किंवा आंबेविक्रीचा व्यवसाय करतात. या महिलांना पालिकेकडून २० ते ६० रुपये शुल्क आकारले जाते. सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात बसून विक्री करून दोन चारशे रुपये कमवून घर चालवणाऱ्या महिलांकडून ४० ते ६० रुपये रोजचे घेणे हे चुकीचे आहे. हे शुल्क माफ करावे व या महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

चौकट
थिबा पॅलेस परिसरातील सुर्वे घाटीत दुर्गंधी
थिबा पॅलेस परिसरातील सुर्वे घाटीमध्ये गटाराचे पाणी येऊन दुर्गंधी पसरली आहे. त्याबद्दल योग्य कारवाई करून तो परिसर दुर्गंधीमुक्त करावा व जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली. या वेळी महिला शहराध्यक्ष सुश्मिता सुर्वे, शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, शहर सचिव संपदा राणा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com