अर्जुना प्रकल्पातील कालव्यांमुळे 6171 हेक्टर सिंचनाखाली
४७६१२
४७६१५
४७६१६
४७६२१
rat२५p२०.jpg
४७६१२
राजापूरः अर्जुना धरणातील पाणी शेतीपर्यंत पोचवण्यासाठी उभारलेला पूल.
rat२५p२१.jpg
राजापूरः कालव्यातील पाणी पाईपने ताम्हाणे येथील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचल्याची पाहणी करताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि शेतकरी.
rat२५p२२.jpg
राजापूरः अर्जुना धरणातील पाणी नेण्यासाठी काढलेला कालवा.
- rat२५p२३.jpg- अर्जूना मध्यम प्रकल्प
अर्जुना कालव्यांमुळे ६१७१ हेक्टर सिंचनाखाली
पाटबंधारे विभाग; पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यास आरंभ, शेतकऱ्यांसाठी ६५०० आउटलेट
चौकट
एक नजर
* सुमारे बारा गावे सिंचनाखाली
* एक लाख शेतकऱ्यांना फायदा
* शेतीला मिळणार चोवीस तास पाणी
* कोकणातील महत्वाकांक्षी प्रकल्प
* पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार
* काही शेतकऱ्यांकडून दुबार शेतीला आरंभ
राजेंद्र बाईतः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ः तालुक्यातील अर्जुना नदीवर उभारलेल्या मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील पाणी सिंचनसाठी वापरता यावे म्हणून दोन कालवे काढण्यात आले आहेत. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातून पूर्णक्षमतेने पाणी सोडण्याची यशस्वी चाचणी आज घेण्यात आली. या पाण्यामुळे सुमारे बारा गावातील ६ हजार १७१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या कालव्यातून प्रतिसेकंद दोन घनमीटर वेगाने सोडलेले पाणी अपेक्षित ठिकाणापर्यंत पोचल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
धरण परिसरातील पडिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवर मध्यम प्रकल्प उभारण्याचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेतले होते. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिकरित्या पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी दोन कालवे बांधण्यात आले आहेत. गेल्या वर्षी धरणातील पाणी या कालव्यातून सोडण्यात आले. पावसाळ्यात यातील उजवा कालवा एका ठिकाणी फुटला होता; परंतू त्याची तातडीने डागडुजीही केली गेली. कालवा उभारण्याचे काम झाल्यानंतर पूर्णक्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी त्याची चाचणी घेण्यात आली. प्रतिसेकंद ३ घनमीटर पाणी या कालव्यातून वाहण्याची क्षमता आहे. आज प्रतिसेकंद २ घनमीटर पाणी कालव्यातून सोडले गेले. कालव्यातील पाणी शेतामध्ये नेण्यासाठी साडेसहा हजार आउटलेट ठेवण्यात आले आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी लागेल तेव्हा या आउटलेटमधून शेतीसाठी पाणी घेण्याची व्यवस्था केली आहे. आज सोडलेले पाणी वाघणगाव येथील शेवटच्या आउटलेटपर्यंत पोचलेले होते.
कालव्याच्या पाण्याचा उपयोग करून १५ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सुमारे २५ हजार सातबाऱ्यांवरील १ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. धरणावरील डाव्या कालव्यावर दहा गावांना फायदा होणार आहे तसेच शेतकऱ्यांना चोवीस तास पाणी उपलब्ध होणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. धरण आणि कालवा बांधण्यासाठी १ हजार १८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या धरणासाठी पाचल, पांगरी आणि करक १, करक २ या गावांचे पुनर्वसन केले आहे.
चौकट १
पुरेसा पाणीसाठा
अर्जुना धरणाची क्षमता ७४ दशलक्ष घन मीटर एवढी असून, यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे त्यामध्ये ६४ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कालव्यामधून सतत पाणी सोडले तरीही मे महिन्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट २
या गावांना होणार लाभ
* डावा कालवाः तळवडे, रायपाटण, ताम्हीण, कुशिवडे
* उजवा कालवाः करक, रिंगणे, विलवडे, वाघणगाव, व्हेळ
चौकट ३
६५० किमीची पाईपलाईन
कोकणातील बहुसंख्य भाग डोंगराळ असल्यामुळे धरणाचे पाणी कालव्याद्वारे सर्वत्र पोचवणे शक्य होत नाही. त्यासाठी राज्यशासनाने बंदिस्त नलिका योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अर्जुना नदीवरील कालव्यातील पाणी शेवटच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी बंदिस्त नलिका योजनेतून ६५० किलोमीटरची पीव्हीसी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्या द्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
कोट
अर्जुना नदीवर उभारलेल्या मध्यम प्रकल्प आणि त्यावरील डाव्या, उजव्या कालव्याचे ९० टक्केहून अधिक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे धरणातील पाणी पूर्णक्षमतेने कालव्यात सोडण्यात आले. पाणी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी उभारलेल्या आउटलेटपैकी ९५ टक्के ठिकाणी कालव्याचे पाणी पोचलेले आहे.
- विवेक सोनार, पाटबंधारे अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

