मुलींची इनडोअर क्रिकेट स्पर्धा
मुलींच्या इनडोअर
क्रिकेट स्पर्धा २८ला
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींचे इनडोअर टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ ला कृषी भवन येथे होणार आहेत. या इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष व राजापूर विधानसभा आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तरी या स्पर्धेला जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपिन बंदरकर कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी आदींनी केले आहे. या स्पर्धा शांतीनगर बाजार समितीच्या आर्टिफिशल टर्फ येथे टेनिस सॉफ्ट बॉल वर होणार आहेत. २८ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तरी पहिल्या १६ संघाना प्रवेश दिला जाईल.संघानी दिनांक २७ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपर्यंत आपल्या संघाची नावे सह सचिव बलराम कोतवडेकर यांच्या जवळ कळवावी, असे आवाहन असोसिएशनद्वारे करण्यात आले आहे.
-------
वडेट्टीवार यांनी
माफी मागावी
रत्नागिरी ः जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समितीने त्यांचा जाहीर निषेध केला आहे. वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. याबाबत वडेट्टीवार यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

