रोजगारासाठी दर्जात्मक शिक्षण आवश्यक

रोजगारासाठी दर्जात्मक शिक्षण आवश्यक
Published on

47608

रोजगारासाठी दर्जात्मक शिक्षण आवश्यक

पद्मश्री परशुराम गंगावणे ः ओरोस महाविद्यालयात स्नेहसंमेलन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः शिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास व दर्जात्मक शिक्षण गरजेचे आहे. त्यादृष्टीने या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावा, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.
मुंबई विद्यापीठ संलग्न प्रा. सुभाष फाटक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस खर्येवाडी या महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी संस्थेचे विश्वस्त पद्मश्री गंगावणे बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील फाटक, व्यवस्थापकीय संचालक मनीष मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश तावडे, देवदत्त परुळेकर, आनंद सावंत, सुप्रिया वालावलकर, भगवान कदम, नम्रता रासम, सुभाष बांबुळकर, भाग्यश्री रेवडेकर, प्रचिती पिळणकर, प्रियांका चोरगे, डी. एन. तिवरेकर, पार्थ पटवर्धन, सेजल शिरवलकर आदी उपस्थित होते.
संस्थेतर्फे घेतलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, विविध क्षेत्रात शाळास्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. गंगावणे म्हणाले, ‘‘कळसुत्री बाहुली ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेली कला आहे. या कलेतून औरंगजेब आणि शिवरायांच्या काळात माहिती पुरविली जात होती. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी अशा कलांची माहिती व्हावी, ती जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. संस्थेमार्फत हस्तकला, सुतारकाम व अन्य रोजगाराच्या दृष्टीने प्रशिक्षण द्यावे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.’’ यावेळी पिंगुळी येथे असलेले कलादालन पाहण्यासाठी व मार्गदर्शनासाठी विविध जिल्ह्यांतून, राज्यातून मुले येतात. सध्या पर्यटकांचीही संख्या वाढली आहे, असेही ते म्हणाले. संदेश तांबे यांनी सूत्रसंचालन केले.
....................
‘विश्वकर्मा प्रशिक्षण दालनाचा लाभ घ्या’
श्री. सावंत म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना, तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ओरोस येथे विश्वकर्मा प्रशिक्षण दालन सुरू केले आहे. या प्रशिक्षणातून सुतारकाम, गवंडीकाम यांसारख्या कला शिकाव्यात, हा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील तरुणांकडून आतापर्यंत प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात आज कर्नाटक, बिहार, विजापूर व अन्य भागांतून कारागीर येऊन येथील कामाचा निधी नेत आहेत. आपल्या जिल्ह्यात फक्त ठराविक ठेकेदार कार्यरत आहेत. रोजगार मिळविण्यासाठी येथील तरुणांनी विश्वकर्मासारख्या प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रशिक्षित व्हावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com