आंबोलीत आज विविध कार्यक्रम

आंबोलीत आज विविध कार्यक्रम

Published on

आंबोलीत आज
विविध कार्यक्रम
आंबोली ः महाशिवरात्रीनिमित्त हिरण्यकेशी येथे उद्या (ता. २६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंबोली-हिरण्यकेशी येथे महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक येतात. येथील रस्ता वन खात्याने परवानगी न दिल्याने रखडला आहे. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करून रस्ता करण्यात आला आहे. जादा बस सोडण्यात येणार आहे. सकाळपासून विविध धार्मिक विधी, श्रीफळ, केळी ठेवणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार आहेत. स्नानकुंडात स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गावकरी मंडळींनी केले आहे.
............
बांदा वाचनालयात
उद्या ग्रंथप्रदर्शन
बांदा ः येथील नट वाचनालयात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ४ वाजता कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात आयोजित केला आहे. यानिमित्ताने ‘माझ्या आठवणीतल्या कविता’ हा सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शन मांडण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास अगत्य उपस्थित राहून आपली कविता सादर करावी, असे आवाहन नट वाचनालयाने केले आहे.
..............
सातोसे येथे आज
दशावतार नाटक
बांदा ः श्री स्वयंभू महादेव मंदिर सातोसे देऊळवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त उद्या (ता. २६) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ ते १२ शिवपिंडीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांची फुगडी, ५ वाजता ग्रामस्थांचे भजन, ७ वाजता श्री मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सातोसे व ग्रामस्थांनी केले आहे.
.................
सावंतवाडीत उद्या
मराठी गौरव दिन
सावंतवाडी ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन गुरुवारी (ता. २७) सकाळी ९.३० वाजता येथील भोसले इंटरनॅशनल स्कूल, महादेव भाटले, खासकीलवाडा येथे आयोजित केला आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारा हा मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रम आहे. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडी, त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी दादा मडकईकर यांचा खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा ‘आठवणीतील जुन्या कविता’ कार्यक्रम होणार आहे. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोमसाप सावंतवाडी शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहतील, असे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, विनायक गावस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com