मराठी भाषा दिनी आज विविध कार्यक्रम
रत्नागिरीत आज विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषादिन साजरा केला जाणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २६) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वंदना, मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा समिती सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध ठेवलेल्या शिरगाव या ठिकाणी बुधवारी (ता. २६) सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर वंदना, सायं. ७ वा. सावरकर नाट्यगृहात सागरा प्राण तळमळला हे दोनअंकी नाटक होईल. हे नाटक विनामुल्य आहे. गुरूवारी (ता. २७) सावरकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजता मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माणसाचे योगदान आणि शासनाची भूमिका या परिसंवादात निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, विश्वस्त प्रमुख रमेश कीर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे सहभागी होणार आहेत. दुपारी १२.३० ते २ वाजता अरूण मौर्ये, अमेय धोपटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोमसाप, शिक्षण विभाग आणि महसूल विभागातील नामवंत कवींचे संमेलन होणार आहे. दुपारी २.३० ते ४ वाजता बक्षीस वितरण आणि समारोप होणार आहे. सायं. ५ वाजता ग्रंथदिंडी आणि ७ वाजता मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

