चिपळूण ः मंदिर सरकारीकरणाविरोधात जनआंदोलन
मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात जनआंदोलन
सुनील घनवट; देवरहाटी, गावरहाटीच्या जागा शासनाच्या ताब्यातून मुक्त करा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने परस्पर ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व जमिनी शासनाच्या ताब्यातून मुक्त कराव्यात. त्या तत्काळ देवस्थानच्या नावे न केल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा मंदिर महासंघाच्यावतीने चिपळुणात झालेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशनात सुनील घनवट यांनी दिला.
बहादूरशेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात हे अधिवेशन झाले. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम, स्वामी स्वरूपानंद सेवामंडळ पावसचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई, महाराष्ट्र मंदिर महासंघ, उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक अभय महाराज सहस्रबुद्धे, निवृत्त सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, अधिवक्ता जनार्दन करपे उपस्थित होते.
घनवट म्हणाले की, मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात येत्या काही दिवसांत आंदोलन छेडायचे आहे. यासाठी संघटित व्हावे. मंदिरांच्या संघटनात्मक रचनेचा, कार्याचा एक आदर्शवत रत्नागिरी पॅटर्न तयार करूया. मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मंदिर महासंघ हे व्यासपीठ आहे. सद्यःस्थितीत देशभरात १५ हजार मंदिरांचे संघटन झाले आहे. मंदिर सरकारीकरणामुळे तमिळनाडूमध्ये अनेक मंदिरे बंद पडली आहेत. पुरोगाम्यांचे मंदिराबाबतचे नॅरेटिव्ह खोडून काढण्याची आवश्यकता आहे.
सत्यवान कदम म्हणाले की, मंदिर हा हिंदू संस्कृतीचा वारसा आहे. तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झाले आहे. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

