शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद
swt2530.jpg
47681
कुडाळः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सराव परीक्षेचे उद्घाटन करताना गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर. बाजूला समितीचे पदाधिकारी व शिक्षक. (छायाचित्रः अजय सावंत)
शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद
संदेश किंजवडेकरः कुडाळात डॉ. कलाम टॅलेंट सराव परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सराव परीक्षा महत्त्वाची आहे. अशा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम प्राथमिक शिक्षक समिती करीत असून हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यांत ही परीक्षा होत असून येथील तालुका स्कूलमध्ये या परीक्षेचे उद्घाटन किंजवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भिकाजी तळेकर, दादा जांभवडेकर, सुरेखा कदम, नंदकुमार राणे, आनंद नवार, यल्लाप्पा दळवी, आप्पा सावंत, महेश गावडे, गुरुप्रसाद सावंत, मिनीनाथ अडसरे, प्राजक्ता वालावलकर, गौरव नाईक आदी उपस्थित होते.
किंजवडेकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती विद्यार्थ्यांसाठी गेले काही वर्षे अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर आहे. हाच धागा पकडून शिक्षक समिती स्पर्धात्मक परीक्षा घेऊन वाटचाल करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये या समितीच्या वतीने या परीक्षा होत असून मुलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इस्त्रो येथे विमानाने जाण्याची संधी मिळते. त्यानुसार मुलांनी गुणवत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा. ही सराव परीक्षा येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी बुद्धिमत्तेला चालना देणारी ठरेल.’’
जांभवडेकर यांनी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबवित आहे. भविष्यात मुलांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार अशा अनेक स्पर्धा घेऊ, असे सांगितले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक समितीचे कुडाळ तालुका सचिव महेश गावडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

