चिपळूण ःसमर्थ शिंदेच्या नेतृत्व गुणांना राष्ट्रपतींची दाद

चिपळूण ःसमर्थ शिंदेच्या नेतृत्व गुणांना राष्ट्रपतींची दाद

Published on

ratchl२५४.jpg
47686
समर्थ शिंदे
---------

कळकवणेच्या समर्थ शिंदेच्या
नेतृत्व गुणांना राष्ट्रपतींची दाद
स्पर्धा परीक्षेत सुयश; शिमलामध्ये प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ः कोकणचे व तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र समर्थ शिंदे यांना दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयएअॅण्डएएस) विभागाकडून नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या नेतृत्वाला खुद्द राष्ट्रपतींकडून दाद मिळाली. शिमला येथील प्रशिक्षणात प्रशासकीय सेवेतील माहितीसह इमानदारी, पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणाने काम करण्याची उर्मी मिळाली असल्याची भावना समर्थ शिंदे यांनी या निमित्ताने स्पष्ट केली.
भारतीय लोकसेवा आयोग परीक्षेतून निवड झालेल्या भावी सनदी अधिकाऱ्यांना शिमला येथे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर संबंधित अधिकाऱ्यांची दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घडवून देण्यात आली. या वेळी विविध विभागातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव कथन केले. या वेळी आयए अॅण्ड एएस विभागात प्रशिक्षण घेणारे शिंदे यांनी भारतातील १९ अधिकाऱ्यांच्या टीमचे नेतृत्व करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, भारतीय लोकसेवा आयोग २०२४च्या बॅचमधून निवड झाली. शिमला येथील प्रशिक्षणात देशातील प्रतिष्ठित संस्थांशी काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे कामकाज अनुभवत आहे. हे प्रशिक्षण प्रभावी नागरिक आणि अधिकारी बनण्यास उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com