शिक्षकांनी घेतला इस्रो दौऱ्याचा अनुभव

शिक्षकांनी घेतला इस्रो दौऱ्याचा अनुभव

Published on

-rat२५p३०.jpg-
२५N४७६७९
मंडणगड : इस्रो अभ्यासदौऱ्याची चित्रफीत पाहताना शिक्षक, अधिकारी.
----
शिक्षकांनी घेतला इस्रो दौऱ्याचा अनुभव
मंडणगड पंचायत समितीत कार्यक्रम; अनुभव कथनातून प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः मंडणगड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या काढण्यात आलेल्या इस्रो अभ्यासदौऱ्याची माहिती चित्रफीत आणि सहभागी शिक्षकांच्या अनुभव कथनाच्या माध्यमातून तालुक्यातील अन्य शिक्षकांसमोर सादर करण्यात आली. त्याचे शिक्षकांमधून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी असे वीसजण हे पाच दिवसांच्या इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्याची प्रशिक्षण वर्गातील सर्व शिक्षकांना माहिती देण्यासाठी पंचायत समिती मंडणगड येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. पहिला टप्पा पहिली ते पाचवी, दुसरा टप्पा सहावी ते बारावीच्या शिक्षकांना संपूर्ण दौरा प्रवासाची चित्रफीत दाखवून अनुभव कथनातून मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये इस्रो अभ्यास दौऱ्याचा प्रवास, दौऱ्यात काय पाहिले, तेथील कामकाज कशा पद्धतीने चालते, भौगोलिक स्थळांची माहिती तसेच आत्मसात केलेले वैज्ञानिक ज्ञान याचे विविध पद्धतीने विमोचन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी अभिषेक गवांडे, डॉ. नागपुरे, गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे, केंद्रप्रमुख, इस्रो दौऱ्यात सहभागी झालेले सर्व शिक्षक व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com