‘आपले सरकार’ अॅपमधील त्रुटी दूर करा

‘आपले सरकार’ अॅपमधील त्रुटी दूर करा

Published on

47689

‘आपले सरकार’ अॅपमधील त्रुटी दूर करा

शिक्षक महासंघाची मागणी; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : दहावी, बारावी ग्रेस गुणांसाठी ‘आपले सरकार’ या ॲपमधील अनावश्यक १८ बाबी रद्द कराव्यात. यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, महासंघाचे पदाधिकारी कमलेश गोसावी व महेंद्र वारंग यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याशी चर्चा करून अडचणीच्या असणाऱ्या ॲपमधील त्रुटी रद्द कराव्यात, अशी मागणी केली.
स्कूल कोडमध्ये यू-डायस कोड किंवा इंडेक्स नंबर यापैकी एक असावे, विद्यार्थ्यांचा पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, वय, जन्मतारीख, जेंडर, शाळेचा पत्ता, शाळेचा पिनकोड, टेलिफोन नंबर, विद्यार्थ्यांचा पिन कोड, कॅटेगिरी, सब कॅटेगिरी, डिलिव्हरी मोड या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही. ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिटची व्यवस्था असावी. या ॲपमधील त्रुटींची जिल्हा क्रीडा अधिकारी शिरस यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी महासंघाचे अध्यक्ष श्री. शिंदे यांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये रत्नागिरी विभागीय दहावी बोर्ड सचिवांकडे लेखी निवेदन देऊन संबंधित त्रुटी रद्द करण्याची मागणी करावी. या बाबी बोर्डाशी निगडित असल्याने त्यांचा तिथूनच निपटारा होईल, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी स्पष्ट केले. दहावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनींचे वय अठरा वर्षांखाली असल्याने या खेळाडूंच्या नावावर फॉर्म भरता येणार नाही. त्यांच्या आई-वडिलांच्या नावे हा फॉर्म भरायचा असल्याने शाळांना ही प्रक्रिया कटकटीची व अडचणीची ठरणार आहे. ॲपमध्ये क्रिकेट, आट्यापाट्या, वुशू, थ्रो बॉल, सेफेक टकरा या खेळांचा अंतर्भाव ग्रेस गुण ॲपमध्ये करावा, अशी विनंती केली.
---
‘रत्नागिरीत बोर्डाचे लक्ष वेधणार’
यावेळी क्रीडा अधिकाऱ्यांची महासंघाशी सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लवकरच रत्नागिरी दहावी बोर्ड या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पदाधिकारी एकत्रित येऊन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे निवेदन देऊन बोर्डाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात येईल. ग्रेस गुण फॉर्म सबमिट करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत असल्याने या अगोदर ही समस्या सोडविण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com