आचरा येथील देव रामेश्वर आज कुणकेश्वर भेटीला

आचरा येथील देव रामेश्वर आज कुणकेश्वर भेटीला

Published on

47692

आचरा येथील देव रामेश्वर आज कुणकेश्वर भेटीला

३९ वर्षांनी सोहळा ः ऐतिहासिक क्षणाची जिल्हावासीयांना आतुरता

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २५ ः संस्थान आचरे गावचा राजा इनामदार श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात असंख्य रयतेसह उद्या (ता. २६) महाशिवरात्रीला श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळाला तब्बल ३९ वर्षांनी भेटीसाठी रवाना होणार आहे. या अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आचरावासीयांसह जिल्ह्यावासीय उत्सुक झाले आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात येणार आहेत. यादृष्टीने गेले काही दिवस श्रींची स्वारी जाण्याच्या पारंपरिक वाटांच्या स्वच्छतेसाठी देवस्थान समिती बारापाच मानकऱ्यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ झटत आहेत.
या शाही भेटीसोबत जामसंडे दिर्बा माऊली आणि रामेश्वर भेटीचा सोहळाही होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची आतुरता वाढली आहे. देवस्वारीसोबत जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी भाविकांतर्फे अल्पोपहार, भोजन व्यवस्था केल्याचे समजते. महिलांसाठी प्रसाधनगृहे तसेच कचरा नियोजनासाठी कचरा कुंड्या उभारल्या आहेत. आरोग्य पथकही तैनात असल्याची माहिती देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांनी दिली. दरम्यान, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासाची विश्वस्त मंडळी या सोहळ्याचे नियोजन करून वाडीवार मंडळांना तसेच देव स्वारींबरोबर जाणाऱ्या रयतेला मार्गदर्शन केले आहे.
---
१४ ते १५ किलोमीटरपर्यंत सफाई
याबाबत देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आचरा गावचे इनामदार श्री देव रामेश्वर कसबा आचरे यांच्या कौल प्रसादाने दक्षिण कोकणची काशी मानले जाणाऱ्या स्वयंभू श्री देव कुणकेश्वर महास्थळास ३९ वर्षांनंतर आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे आपला लवाजमा तथा सरंजामशाही राजेशाही थाटाने उद्या (ता. २६) महाशिवरात्रीला भेटीला जाणार आहेत. आचरे व कुणकेश्वर पंचक्रोशीतील सर्व मानकरी चाकर नोकर व ग्रामस्थ उत्साहाने शाही भेटीत आपला खारीचा वाटा उचलावा, या हेतूने १४ ते१५ किलोमीटरपर्यंतचा मार्गाची ग्रामस्थांनी सफाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com