स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार
-rat२५p३१.jpg ः
२५N४७६८२
राजापूर ः माजी आमदार राजन साळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना आमदार किरण सामंत.
---
स्थानिक निवडणुकीत भगवा फडकणार
किरण सामंत ः राजापुरात राजन साळवींचे जोरदार स्वागत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राजापूरमध्ये पहिल्यांदा आलेले माजी आमदार राजन साळवी यांचे शिवसेना आणि शिवसैनिकांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राजापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका निवडणुकांमध्ये लक्षवेधी विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला.
मातोश्री सभागृहामध्ये झालेल्या शिवसेना कायकर्ता मेळाव्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, राजू कुरूप, प्रकाश कुवळेकर, विलास चाळके, शहरप्रमुख सौरभ खडपे आदी उपस्थित होते. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. माजी आमदार साळवी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यबाण निशाणी असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याप्रमाणे शिवसेना नेते एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री सामंत, आमदार सामंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

