

ज्येष्ठांनी विज्ञानकेंद्राचे दूत व्हावे
सदानंद भागवत ः ५० सदस्यांची केंद्राला भेट
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २६ : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स सेंटरच्या प्रथम वर्धापनदिनी देवरूख प्रसन्न ज्येष्ठ नागरिक संघाच्या ५० सदस्यांनी विज्ञान केंद्राला भेट देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी ज्येष्ठ नागरिकांनी या सेंटरबाबत जनजागृती करण्यासाठी विज्ञान केंद्राचे दूत व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी भागवत यांनी विज्ञानकेंद्राचा आढावा घेताना या केंद्राचा ७ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, तीन सभागृहात विविध प्रयोगांची ५६ एक्झिबिटस मांडण्यात आली आहेत, असे सांगितले. विज्ञान बगीचाही आता सुरू झाला आहे. पुढचा टप्पा ७ कोटींचा असून, मुलांना प्रयोग करता येतील, असे अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे, असे सांगितले. यावेळी प्रसन्न ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव नार्वेकर, डॉ. चंद्रशेखर केदारी, अण्णा शहाणे, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य सरदार पाटील, अशोक लिमये आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.