एम्बॉसिंग प्लेट बसवणाऱ्या केंद्रावरील गैरसोय दूर करा

एम्बॉसिंग प्लेट बसवणाऱ्या केंद्रावरील गैरसोय दूर करा

Published on

- rat२५p२८.jpg-
२५N४७६७७
रत्नागिरी ः ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट देणाऱ्या एजन्सीमधील अनेक गैरसोयीबाबत विचारणा करताना शिवसेना पदाधिकारी निमेश नायर. शेजारी कार्यकर्ते, नागरिक.
-----------
‘एचएसआरपी’ केंद्रावरील गैरसोय दूर करा
निमेश नायर ः वाहने लाखात, एजन्सी एकच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : शासनाने सर्व प्रकारच्या वाहनांना मार्च अखेरपर्यंत हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची सक्तीचे केल्यामुळे रत्नागिरीतील केंद्रावर वाहनचालकांची तारांबळ उडालेली आहे. रत्नागिरीत वाहनांची संख्या लाखात आणि शासनाने एम्बॉसिंग प्लेट बसवण्यासाठी एकच एजन्सी नेमली आहे. ती एजन्सी रत्नागिरी शहराबाहेर असून तिथे कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा अशी सज्जड दम शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक निमेश नायर यांनी दिला. त्यावेळी एजन्सी मालकाने दोन दिवसात सर्व सोयीसुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरीसाठी शासनाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी रियल मेझॉन एम्बॉसिंग सेंटर नावाची एकच एजन्सी नेमलेली आहे. ती एजन्सी कोल्हापूर येथील आहे. त्यांचे कार्यालय रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर कुवारबावजवळ आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी हेलपाटा पडत आहे. तरीही नागरिक शासकीय नियम पाळण्यासाठी नवीन नंबरप्लेट वाहनांना बसवण्यासाठी वेळ काढून एजन्सीमध्ये जात आहेत; परंतु त्या एजन्सीमध्ये कमी कर्मचारी असल्यामुळे वाहनधारकांना तिथेच बसून रहावे लागत आहे. ताटकळत राहिलेल्या नागरिकांना या एजन्सीकडून पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. तिथे बसण्यासाठीही वेगळी व्यवस्था नाही. या गैरसोयींबद्दल रत्नागिरीतील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत अनेक वाहनचालकांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रारी केल्या. निमेश नायर यांनी शिवसेना स्टाईलने या एजन्सीचालक पटेल यांना जाब विचारला. एजन्सी चालक पटेल यांनी चूक मान्य करीत दोन दिवसात गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्रावर आणखीन १० कर्मचारी नेमण्याचे आश्वासनही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com