

मोटार-दुचाकीच्या धडकेत तरुण ठार
निवे बुद्रुकजवळ अपघात; मोटारचालकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २५ ः संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील नागझरी येथील मंदिराजवळ दुचाकी आणि मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. मिलन जसबीर बोहरा, असे मृत स्वाराचे नाव आहे.
मिलन बोहरा हा दुचाकीने जात असताना नितीन कृष्णा मोहिते (वय ४१) याच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात सोमवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. या अपघातात मिलन बोहरा याचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी (ता. २५) देवरूख पोलिस ठाणे येथे संबंधित अपघाताची नोंद करुन नितीन कृष्णा मोहिते या मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी व तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव हे करीत आहे. याबाबत शांताराम तुकाराम इप्ते यांनी देवरूख पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.