पावस-ओले काजूगर १२०० रुपये किलो

पावस-ओले काजूगर १२०० रुपये किलो

Published on

rat25p29.jpg-
47678
पावसः येथील पंचक्रोशीत काजू पीक उत्तम आले असून, ओल्या काजूगरांना दरही चांगला मिळत आहे.
-----------
ओले काजूगर १२०० रुपये किलो
पावस पंचक्रोशीत पीक उत्तम; सुक्या बीचे दर घसरण्याची शक्यता
पावस, ता. २५ ः हापूस आंब्यापाठोपाठ पावस परिसरामध्ये काजू पिकही समाधानकारक आले आहे. सध्या काजू बी ला दीडशे रुपये किलो दर मिळत असून, ओल्या काजूगराला चांगली मागणी असून हजार ते बाराशे रुपये किलो दर मिळत आहे.
पावस पंचक्रोशीत हापूस आंबा व काजूचे समाधानकारक उत्पादन आले असून, बागायतदारांनी आंबाकाढणीस सुरवात केली आहे. आंब्यापाठोपाठ काजू हंगामही सुरू झाला असून, बाजारपेठेत ओले काजूगर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याला दरही चांगला मिळत असल्याने ग्रामीण भागातून महिला ओले काजूगर घेऊन विक्रीसाठी येत आहेत. सध्या किलोला हजार ते बाराशे असा दर मिळत आहे. सुक्या बी ला दीडशे रुपये दर मिळत आहे; परंतु काजू बी ची आवक वाढल्यानंतर हा दर घसरण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकरी अनिल बिर्जे म्हणाले, हापूस आंबा व काजू बी ला सुरवातीला दर चांगला मिळतो; परंतु कालांतराने आवक वाढल्याने दर घसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते. यासाठी हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com