म्हापण सिद्धमहापुरुष 
उत्सव उद्यापासून

म्हापण सिद्धमहापुरुष उत्सव उद्यापासून

Published on

म्हापण सिद्धमहापुरुष
उत्सव उद्यापासून
म्हापण ः म्हापण-गोसावीवाडी येथील सिद्धमहापुरुष मठात महाशिवरात्री भंडारा उत्सव शुक्रवारी (ता. २८) होणार आहे. यानिमित्त गुरुवारी (ता. २७) सकाळी मठात विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता बाबल वाडकर प्रस्तुत पावणाई, रवळनाथ दशावतार नाट्यमंडळ पाट यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, रात्री ९ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शुक्रवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ७ वाजता घटस्थापना, ७.३० वाजता भजन, रात्री १० वाजता विठू माऊली प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले बुवा ऋषिकेश वेंगुर्लेकर (पखवाज श्याम तांबे, तबला विनायक रांबाडे) विरुद्ध सद्‌गुरू संगीत भजन मंडळ कुडाळ बुवा वैभव सावंत (पखवाज निखिल पावसकर, तबला साई नाईक) यांचा डबलबारी भजन सामना होणार आहे. शनिवारी (ता. १) पहाटे ५.३० वाजता भंडारा प्रसाद, सकाळी ९ वाजता कालोत्सव, १० वाजता ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन भंडारा उत्सव समिती म्हापण-गोसावीवाडी यांनी केले आहे.
.................
कांदळगाव येथे
उद्या ग्रंथ प्रदर्शन
मालवण ः कांदळगाव येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातर्फे गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. केंद्राने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी ही राजभाषा असून तिचे संवर्धन आणि अधिकाधिक लेखन होण्याच्या उद्देशाने तसेच मराठी भाषा निरंतर टिकून राहावी, यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या उद्देशाने व वाचकांमध्ये मराठी भाषेविषयी जाणीव जागृती आणि निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रंथालयातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये मराठी विषयावरील विविध प्रकारचे साहित्य पाहायला आणि त्याचे वाचन करायला मिळणार आहे. मराठी भाषेचे हे सौंदर्य पाहण्यासाठी वाचकांनी ग्रंथालय प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन ग्रंथालयाने केले आहे.
............
घरकुल मंजुरी पत्रांचे
अणसूरमध्ये वाटप
वेंगुर्ले ः प्रधानमंत्री टप्पा-२ अंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थींना अणसूर ग्रामपंचायत येथे मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रे देण्यात आली. गावातील १२ कुटुंबांना या दुसऱ्या टप्प्यात घरकुल मंजूर झाले आहे. सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य वामन गावडे, संयमी गावडे, सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, मुख्याध्यापक श्री. मळगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी सोनू गावडे, सुप्रिया गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर आदींची उपस्थिती होती. सरपंच सत्यविजय गावडे यांनी लाभार्थींचे स्वागत करुन केंद्राच्या घरकुल योजनेची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com