गणित प्रावीण्य परीक्षेत ''भंडारी एज्युकेशन''चे यश
47728
गणित प्रावीण्य परीक्षेत
‘भंडारी एज्युकेशन’चे यश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत पाचवीमधील आदित्य हारगिले आणि वैष्णवी आंबेरकर तसेच आठवीमधील प्रथमेश चव्हाण यांनी सर्वोत्तम गुण संपादन केले. हे तिन्ही विद्यार्थी संबोध परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले तसेच सहायक शिक्षिका पूनम मेस्त्री, सहाय्यक शिक्षिका अस्मिता वाईरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, काँसिल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी अभिनंदन केले.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

