वक्तृत्व स्पर्धेत वेदा चाळके प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत वेदा चाळके प्रथम
Published on

वक्तृत्व स्पर्धेत
वेदा चाळके प्रथम
संगमेश्वरः श्री खड्गेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त देवळे येथे घेण्यात आलेल्या पाठांतर व वक्तृत्व स्पर्धेत शाळा चाफवली नं.१ शाळेची ७ वीची विद्यार्थिनी वेदा चाळके हिने मोबाईल शाप की वरदान या विषयावर भाषण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यासाठी तिला तिचे वर्गशिक्षक व मुख्याध्यापक गजानन मोघे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच वर्षाराणी कदम, निलम सोलापुरे, संगीता मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. याच स्पर्धेत चाफवली शाळा नं. १ च्या पूर्वा जाधव हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. याबद्दल सर्व ग्रामस्थांनी दोघींचे अभिनंदन केले आहे.
----
माजी आमदार साळवींचे
लांजा, राजापुरात स्वागत
राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेना पक्षप्रवेशानंतर राजापूर व लांजा तालुक्याच्यावतीने स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (ता. २५) सकाळी लांजा काळे छात्रालय येथे आणि राजापुरात मातोश्री सभागृहात स्वागत कार्यक्रम झाला. या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी साळवी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राजापूर तालुका तसेच लांजा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
पेढांबे पंचरत्नवाडीत
पाणी साठवण टाकी
संगमेश्वरः तालुक्यातील पेढांबे पंचरत्नवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरचे चेअरमन प्रशांत यादव यांनी पाणी साठवण टाकी उपलब्ध करून दिली. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली. त्याचे उद्घाटन व जलपूजन प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचरत्नवाडी विकास मंडळ, पेढांबे यांच्यावतीने यादव यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असेही सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर, शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख अनिल मोरे, शिवसेना (उबाठा) पेढांबे शाखाप्रमुख शांताराम मते, शाखाप्रमुख किशोर सुर्वे, वाडीप्रमुख यशवंत वेलोंड, गावकर रामचंद्र वेलोंडे, मानकरी दीपक सुर्वे, चिपळूणचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com