तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

Published on

rat२६p१६.jpg -
P२५N४७८०१
राजापूर ः सभेला उपस्थित शिवस्मृती मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य.
---
राजापुरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार
शिवस्मृती मंडळ ; पदाधिकाऱ्यांची निवडी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः शहरातील शिवस्मृती मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप चव्हाण तर खजिनदारपदी अविनाश पाटणकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे तसेच प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार ४३वा शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय शिवस्मृती मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
शिवस्मृती मंडळाची १९८३ मध्ये स्थापन झाली असून, हे ४३वे वर्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळातर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. पुढील महिन्यात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने काल (ता. २५) सायंकाळी शिवस्मृती मंडळाची शहरातील श्री निनादेवी मंदिरामध्ये सभा झाली. या वेळी सर्व संघटना, स्थानिक मंडळे, संस्था आणि प्रतिष्ठाने यांना सोबत घेऊन शिवस्मृती मंडळाच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये शिवस्मृती मंडळामध्ये जबाबदारी घेऊन शिवकार्य करू इच्छितात, अशा नवीन सदस्यांची कार्यकारणी आणि उत्सवातील विविध समित्यांची निवड करण्याचे ठरवण्यात आले आहे. सभेला शिवस्मृती मंडळाचे आजी-माजी पधादिकारी, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com