-भारत केसरी, किंगमेकर टिटवी बैलगाडा प्रथम
भारत केसरी, किंगमेकर टिटवी बैलगाडा प्रथम
अलोरेत रंगली बैलगाडा शर्यत; राज्यभरातून प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंढेतर्फे चिपळूण आयोजित महाराष्ट्र कोकण केसरी २०२५ राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत पै. सचिनशेठ चव्हाण (वाई), तनिष्का बाळशेठ गायकर (गोळवली) यांचा भारत केसरी, हिंदकेसरी सिकंदर तर पियू आशिषशेठ पाटील (तोंडरे-पनवेल), युवराज धनेश डिंबळे (खेड शिवापूर) यांचा किंगमेकर टिटवी या बैलगाड्यांनी विजेतेपद पटकावले.
अलोरे मैदानात ही बैलगाडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी माजी सभापती सूर्यकांत खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व मुंढेतर्फे चिपळूणचे सरपंच महेश खेतले, युवा उद्योजक प्रमोद महाडिक, रूपेश खेतले यांनी पुढाकार घेतला होता. स्पर्धेत उपविजेतेपदाचे मानकरी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्वप्नील शिंदे, अक्षय जाधव, मंदार चव्हाण, दत्ता ड्रायव्हर करंजावडे यांचा महाराष्ट्र कोकण केसरी सोन्या तसेच अभिजित पाटील (विटा), रणजीत पाटील (विटा), सोमनाथ जगदाळे (पेडगाव) यांचा हिंद केसरी महाराष्ट्र कोकण केसरी जीवा या दोन बैलगाड्या ठरल्या. तृतीय क्रमांकाचे व मानाच्या ढालीचे मानकरी तांबवेकराचा किंग सर्जा व श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ यांचा किंग पतंग या बैलगाडा ठरला. चौथा क्रमांक आणि महाराष्ट्र कोकण केसरी किताबाचे मानकरी श्लोक एंटरप्रायजेस जनार्दन होळकर, संकेत महाडिक, अक्षय महाडीक यांचा महाराष्ट्र कोकण केसरी रोलेक्स व चेतन पोकळे (धायरी पुणे) यांचा तुफान वेगाचा पब्लिकचा बेताज बादशहा महाराष्ट्र कोकण केसरी राजा या दोन बैलगाड्या ठरल्या. या स्पर्धेतील विजेता बैलगाडा शर्यत मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, माजी सभापती पूजा निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदींनी उपस्थिती लावली.
----
शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट
बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी चिपळूणवासियांनी प्रचंड गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहून सर्वचजणं अचंबित झालेले होत. शिट्ट्या, टाळ्यांच्या कडकडाटाने मैदान गजबजून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

