कथालेखन स्पर्धेत प्रवीण कांबळे प्रथम

कथालेखन स्पर्धेत प्रवीण कांबळे प्रथम

Published on

-rat३p१०.jpg -
२५N४८७७२
लांजा ः जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रवीण कांबळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवताना श्रद्धा वझे.
----
कथालेखनमध्ये प्रवीण कांबळे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ ः लोकमान्य वाचनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या खुल्या गटामध्ये जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रवीण कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कथालेखन स्पर्धेत खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरूख, राजापूर, रत्नागिरी व लांजा येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये प्रवीण कांबळे (अंधारवाटा), अमित पंडित (एका उद्ध्वस्त ग्रहाची गोष्ट), मनोज भागवत (घळण) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. उत्तेजनार्थ तनुजा प्रभूदेसाई (अपरिचित) व विशाखा चितळे (देवमासा) या स्पर्धकांनी यश प्राप्त केले.
लांजा महाविद्यालय मर्यादित घेण्यात आलेल्या पोस्टकार्ड लेखन स्पर्धेत साक्षी कुरूप, मानसी खानविलकर, केतकी दीक्षित या स्पर्धकांनी अनुक्रमे यश मिळवले. स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झाला. विजेत्यांना मुंबई आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका श्रद्धा वझे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com