वयोश्री योजनेचा 6991 जणांना लाभ
`वयोश्री’चा ६९९१ जणांना लाभ
दीपक घाटे ः खात्यात प्रत्येकी तीन हजार वर्ग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत जिल्ह्यातील ६ हजार ९९१ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
वय ६५ व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत एकूण २१ हजार ८२ इतके पात्र अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाकडून ६ हजार ९९१ लाभार्थ्याच्या बँकखात्यात तीन हजार रुपये रक्कम वर्ग करण्यात आले आहे व उर्वरित १४ हजार ९१ लाभार्थ्यांच्या बँकखात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्याची कार्यवाही शासनस्तरावर चालू आहे. लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकांवर सदर अर्जदारास बँकेमार्फत एसएमएसद्वारे संदेश प्राप्त होतो. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

