राज्य गणेश मूर्ती स्पर्धेत निखिल कोळंबकर प्रथम

राज्य गणेश मूर्ती स्पर्धेत निखिल कोळंबकर प्रथम
Published on

48942

राज्यस्तरीय गणेश मूर्ती
स्पर्धेत कोळंबकर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : श्री गणेश मूर्तिकार संघटना संगमेश्वर आयोजित आमदार शेखर निकम पुरस्कृत आमदार चषक राज्यस्तरीय शाडूमाती गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धेत तालुक्यातील देवबागचे युवा मूर्तिकार निखिल कोळंबकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख येथील लक्ष्मी नृसिंह कार्यालय येथे नुकतीच दोन दिवसीय राज्यस्तरीय शाडूमाती गणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धा झाली. राज्यभरातून अनेक मूर्तिकार या स्पर्धेत सहभागी झाले. सर्वांनीच स्पर्धा आयोजनाचे विशेष कौतुक केले. प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक देवबाग येथील कोळंबकर यांच्या मूर्तीला प्राप्त झाले. त्यांनी मूर्तीत दाखविलेले बारकावे, सुबकता हे सर्व महत्त्वाचे ठरले. गतवर्षी कुडाळ येथे आयोजित जिल्हास्तर स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता. गुरुवर्य सुनील केळूसकर यांचे मार्गदर्शन आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्तिकलेसह ही पारंपरिक कला जोपासण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कोळंबकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com