दापोली शहरात १५ टन कचऱ्याचे संकलन
- rat४p३.jpg-
२५N४८९९९
दापोली ः स्वच्छता अभियानाप्रसंगी साफसफाई करताना श्री बैठक सदस्य.
---
दापोली शहर परिसरात १५ टन कचऱ्याचे संकलन
धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार ; ५४० श्री सदस्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनानिमित्त दापोली शहरात राबवण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात १५ टन कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेमध्ये ५४० श्री सदस्यांनी सहभाग घेतलेला होता.
ही स्वच्छतामोहिम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. दापोलीतील महास्वच्छता अभियानाची सुरवात केळसकर नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झाली. उद्घाटनप्रसंगी दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे, स्वच्छता समितीच्या सभापती जया साळवी, पाणीपुरवठा समितीच्या सभापती प्रिती शिर्के व अभियानात सहभाग घेणारे श्रीसदस्य उपस्थित होते. या अभियानात दापोलीतील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका, केळकरनाका ते आंबा संशोधन केंद्र कोकण कृषी विद्यापीठ, तहसील कार्यालय दापोली परिसर, पंचायत समिती दापोली परिसर व दापोली शहरातील सर्व रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले. अभियानात श्री सदस्यांनी ओला व सुका कचरा एकूण १५ टन संकलित करून दापोली नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आला. जमा केलेला कचरा वाहून नेण्यासाठी १८ वाहने होती. दापोलीतील महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी श्री बैठक जालगाव, श्री बैठक साखळोली, श्री बैठक दाभोळ येथील एकूण ५४० श्री सदस्यांनी सहभाग घेतला.
---
शहरातील परिसर झाला स्वच्छ
दिवसभर राबवलेल्या या मोहिमेमुळे दापोली शहरातील परिसर स्वच्छ झाला. गटारांपासून ते रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यातील कागद, प्लास्टिक पिशव्या वेगवान वाऱ्याबरोबर पसरतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

