डेरवण युथ गेम्समध्ये सहा हजार खेळाडूंचा सहभाग

डेरवण युथ गेम्समध्ये सहा हजार खेळाडूंचा सहभाग
Published on

डेरवण युथ गेम्समध्ये सहा हजार खेळाडू
श्रीकांत पराडकर ः १८ क्रिडा प्रकारांच्या स्पर्धा रंगणार
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३: डेरवण (ता. चिपळुण ) येथील एसव्हीजेसीटी स्पोर्टस अॅकॅडमीच्यावतीने तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून येत्या १० ते १७ मार्च या कालावधीत अकराव्या डेरवण युथ गेम्स २०२५चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सुमारे सहा हजार खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.
युथ गेम्सविषयी माहिती देताना पराडकर म्हणाले, एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अॅकॅडमीची राज्यभर ओळख निर्माण व्हावी आणि नवोदित खेळाडूंना प्रशिक्षित मार्गदर्शन मिळावे, या हेतूने शिवजयंतीचे औचित्य साधून युथ गेम्सचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. या स्पर्धेदरम्यान स्पोर्टस् सायन्सच्या माध्यमातून खेळाडूंनी मानसिक संतुलन कसे राखावे, दुखापती झाल्यास त्यामधून लवकर तंदुरुस्त कसे होता येईल या विषयी राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व डॉक्टर्स यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. स्पर्धेत साडेसहा हजार खेळाडू सहभागी होतील, असा अंदाज आहे. या स्पर्धेत ८, १०, १२, १४, १६, १७, १८ वर्षांखालील मुला-मुलींना प्रवेश घेता येईल. या स्पर्धेत रोख पारितोषिके देणाऱ्या अॅथलेटिक्स, फुटबॉल, टेबलटेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन, योगा, खो-खो, कबड्डी, लंगडी, मल्लखांब, शूटिंग, स्विमिंग, आर्चरी, व्हॉलीबॉल, वॉल क्लायबिंग, कॅरम, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक या अठरा क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com