''गो गो गोविंदा'' नाटकाची रसिकांना भुरळ

''गो गो गोविंदा'' नाटकाची रसिकांना भुरळ

Published on

- rat४p१०.jpg-
२५N४८९९७
रत्नागिरी ः प्रायोगिक थिएटर्सच्या ‘गो गो गोविंदा’ नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ.
----
‘गो गो गोविंदा’ नाटकाची रसिकांना भुरळ
प्रायोगिक थिएटर्सचा प्रयोग; सेवानिवृत्त व्यक्तीभोवती फिरते कथानक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः प्रायोगिक थिएटर्स असोसिएशन दिग्दर्शित महानायक, तीनसान या दोन नाटकांनंतर विनोदी ढंगाने जाणाऱ्या ‘गो गो गोविंदा’ या नाटकाने रसिकांना भुरळ घातली आहे. अमर खामकर दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग नुकताच येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगला. या रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
नाट्यवासल्य या संस्थेची ही निर्मिती असून, या नाटकाचे लेखन श्रीनायक घगवे यांनी केले आहे. या नाटकाची कथा एका सेवानिवृत्त व्यक्तीभोवती फिरते. कथेतील सेवानिवृत्त आप्पा त्यांची एकुलती एक मुलगी राधा हिचे लग्न गोविंदा नावाच्या मुलाशी लावून देतात; पण तो कायम मद्याच्या नशेत असतो. त्याला कंटाळून राधा माहेरी येते; मात्र तिच्या शेजारचे हरी आणि गोविंदा नावाचे दोन तरुण तिच्या प्रेमात पडतात. इकडे राधाच्या नवऱ्याचे मद्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असते. एके दिवशी गोविंदाला समज देण्यासाठी त्याची बहीण अमृता ही तिचा पोलिस निरीक्षक मित्र गायकवाड याला बोलावते; मात्र गायकवाड यांच्या काही गोष्टी गोविंदाला माहिती असल्यामुळे तो त्यालाच ब्लॅकमेल करत असतो. हा गोंधळ सुरू असताना गोविंदाचा गळा दाबून खून होतो. या खूनाचा तपास होईपर्यंत कोणीही घरी जायचे नाही, असे गायकवाड याने आदेश काढलेले असतात. त्यामुळे आप्पा, हरी, गोविंदा, त्यांची मोलकरीण रमा हे सर्व आप्पाच्या फ्लॅटमध्ये राहायला लागतात. याच दरम्यान स्वर्गवासी झालेला गोविंदा शेजारी राहणाऱ्याच्या अंगात येतो. त्याला घालवण्यासाठी मांत्रिक बाबा येतो आणि त्या गोविंदाचा खुनी सापडेपर्यंत रंगमंचावर फक्त धुमाकूळ पाहायला मिळतो, अशी कथा गो गो गोविंदा या नाटकात सादर करण्यात आली आहे. या नाटकात रफिक मुल्ला, दिनेश शिंदे, श्रेया वरवडकर, जुही पावसकर, सिमरन मुल्ला, वैभव लिंगायत, प्रशांत पांचाळ, श्रीनायक घगवे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. नेपथ्य सुधाकर पांचाळ, प्रकाशयोजना शेखर मुळ्ये, पार्श्वसंगीत स्वप्नील धनावडे, रंगभूषा जान्हवी घगवे आणि अमर खामकर यांनी केली आहे. विनोदी ढंगाने जाणाऱ्या नाटकाला रसिकांनी दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com