नवीन धोरणानुसार विद्यार्थी विज्ञानशील व्हावा

नवीन धोरणानुसार विद्यार्थी विज्ञानशील व्हावा

Published on

rat४p१९.jpg-
२५N४९०४३
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व अन्य प्राध्यापक.
----
नव्या धोरणानुसार विद्यार्थी विज्ञानशील व्हावा
डॉ. साखळकर ः अभ्यंकर महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : नवीन शैक्षणिक धोरनुसार आत्ताचा विद्यार्थी हा विज्ञानशील व्हावा व या प्रकारच्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी डॉ. साखळकर बोलत होते. स्पर्धेला अमृत महोत्सवी भारताची वैज्ञानिक प्रगती हा विषय देण्यात आला होता. कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीवीसी विभागातील मुलांनी भरपूर प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. सोनाली कदम, डॉ. मेघना म्हादये व प्रा. नीलेश पाटील यांनी केले. प्रथम क्रमांक अकरावी वाणिज्य अ गट, द्वितीय क्रमांक अकरावी विज्ञान अ गट आणि तृतीय क्रमांक अकरावी विज्ञान ब गटाला मिळाला. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाचे सचिव प्रा. महेश नाईक, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे, कला शाखाप्रमुख प्रा. वैभव कानिटकर व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.
प्रास्ताविक सुयोग सावंत, सूत्रसंचालन ऋषिराज नागवेकर यांनी केले. स्नेहा पेवेकर, केतन नाईक, नीलेश जोशी, सुमेध मोहिते, वैशाली पाटील, स्नेहा ठाकूर, अनिषा जानवलकर, अर्पिता कांबळे आदी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com