चराठे रस्त्यावरील पुलाला भगदाड

चराठे रस्त्यावरील पुलाला भगदाड
Published on

49071

चराठे रस्त्यावरील पुलाला भगदाड

अपघाताची भीती ः बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः तालुक्यातील चराठे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या भोसले नॉलेज सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर मोठी भगदाडे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. विद्यार्थी वर्ग व तसेच अन्य लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडी शहरातून चराठे हद्दीत भोसले नॉलेज सिटीकडे जाणारा हा रस्ता अलीकडे नेहमीच वर्दळीचा ठरला आहे. या मार्गावरील पूल कमकुवत झाला आहे. यासंदर्भात चराठे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधले; मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने पूल अधिकाधिक खचत गेले. सद्यस्थितीत पुलाच्या मधोमध भगदाडे पडली असून, हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तरीही जीव मुठीत घेऊन वाहतूक सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा संभाव्य धोका आहे.
----
‘बांधकाम’चे झोपोचं सोंग!
शहरातून गोठण मार्गे भोसले नॉलेज सिटी व कारिवडे गावात हा रस्ता जातो. पत्रकार कॉलनी नजीक, चराठे ग्रामपंचायतीच्या हद्दीत व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता येतो. विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी सोयीचा आणि जवळचा हा मार्ग आहे. बेळगाव-सावंतवाडी या वर्दळीच्या मार्गाला हा पर्यायी व सुरक्षित रस्ता आहे; मात्र रस्त्याची ही परिस्थिती होईपर्यंत बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेऊन बसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
---
या समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष वेधूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग दखल घेत नाही. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. तातडीने हा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- प्रचिती कुबल, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com