

49074
सिध्देश घाडी याच्या
प्रामाणिकतेचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ४ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलच्या पार्किंग परिसरात सापडलेले १३०० रुपये माजगाव येथील सिद्धेश घाडी याने प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या दहावीची परीक्षा सुरू असून आरपीडी कॉलेजचा बारावीतील विद्यार्थी सिद्धेश घाडी आपल्या भावाला कळसुलकर हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला शाळेच्या पार्किंग भागात १३०० रुपयांची रक्कम सापडली. त्याने ही रक्कम कळसुलकर हायस्कूलमध्ये जमा केली. सिद्धेशच्या या प्रामाणिकपणाचे संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले. सिद्धेश घाडी हा माजगाव येथील वृत्तपत्र वितरक तथा पशुवैद्यकीय कर्मचारी गुरुनाथ घाडी यांचा मुलगा असून, त्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.