सावंतवाडीत शिबिरात २५ जणांचे रक्तदान

सावंतवाडीत शिबिरात २५ जणांचे रक्तदान

Published on

swt413.jpg
49079
सावंतवाडीः येथे ख्रिश्चन शांतता समितीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सावंतवाडीत शिबिरात
२५ जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्गच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ख्रिश्चन शांतता समितीतर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरजूंना या समितीतर्फे मदतीचा हात देखील दिला जातो. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, याची जाणीव ठेवून ख्रिश्चन शांतता समितीने हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला.
या उपक्रमात ख्रिश्चन बंधू-भगिनी तसेच शांतता समितीतील बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरिश चौगुले, डॉ. निखिल अवधूते, टेक्निशियन प्राजक्ता रेडकर, प्रशांत सातार्डेकर, अनिकेत खेडे, मानसी बागेवाडी, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समितीचे अध्यक्ष आनंद चौगुले व इतर पदाधिकारी दिलीप कांबळे, अँथोनी डिसोजा, ऑगस्टिन फर्नांडिस, अतुल भोरे, आशिष फर्नांडिस, सिद्धेश साळस्कर, मुर्गेश गौडर, सीताराम बांदोडकर, पीटर डिसोजा व ‘सामाजिक बांधिलकी’चे कार्यकर्ते रवी जाधव, रुपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com