बदलत्या हवामानामुळे आंब्यासह काजूला फटका

बदलत्या हवामानामुळे आंब्यासह काजूला फटका
Published on

49112

जिल्ह्यात लहरी हवामानाचा
आंब्यासह काजूला फटका

घाटे ः देवगड तहसीलदारांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः येथील नूतन तहसीलदार आर. जे. पवार यांची उद्योजक नंदकुमार घाटे यांनी भेट घेतली. तालुक्यातील आंबा, काजू पिकांसह मासळी हंगामाच्या सद्यःस्थितीबाबत त्यांनी चर्चा केली. बदलत्या हवामानामुळे पिके अडचणीत येत असल्याचे मत यावेळी नोंदवण्यात आले.
देवगड तहसीलदारपदी श्री. पवार रुजू झाल्यानंतर श्री. घाटे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील आंबा, काजू पीक धोक्यात येत असल्याचे घाटे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मासळी हंगामही अडचणीत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय बागायतदारांना आधार देणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. उद्योजक घाटे यांच्या मागण्यांची दखल तहसीलदारांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com