

-rat४p२८.jpg-
P२५N४९०६६
रत्नागिरी : दी यश फाउंडेशनतर्फे कै. शकुंतला माने स्मृती कार्यक्रमात बोलताना बाळ माने. सोबत डावीकडून शिवानी माने, माधवी माने, डॉ. संघमित्रा फुले, राजेश सावंत, मिहिर माने आदी.
---------
शकुंतला माने स्मृती रुग्णालय उभे करणार
बाळ माने ः दी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजमध्ये संकल्प
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : दी यश फाउंडेशनतर्फे एमआयडीसी येथे कै. शकुंतला यशवंतराव माने स्मृती रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांत ५० बेडचे रुग्णालय साकारण्यात येईल आणि पुढील दोन वर्षांत सुपरस्पेशालिटी रुग्णालय रूजू होईल, अशी माहिती माजी आमदार, फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी दिली.
एमआयडीसी येथील विमानतळासमोरील नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी बाळ माने यांच्या मातोश्री शकुंतला माने यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात बोलत होते. येथे आज मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात टेली मेडिसिनप्रमाणे टेली नर्सिंगची सुविधा देण्यात येणार आहे. या द्वारे प्रशिक्षित नर्सिंग विद्यार्थी, कर्मचारी आरोग्यविषयक सुविधा देण्याच्यादृष्टीने व केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्यविषयक योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत, असे बाळ माने यांनी सांगितले.
या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, सध्या आरोग्याच्या अनेकविध सुविधा उपलब्ध आहेत; परंतु काही ठिकाणी मनुष्यबळ कमी पडत आहे. हे मनुष्यबळ दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमधून उपलब्ध व्हावे. प्रादेशिक मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघामित्रा फुले यांनी नर्सिंग कॉलेज व नियोजित हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या. हे हॉस्पिटल लवकर पूर्ण होऊन रुग्णसेवा चालू करावी, असे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्करराव जगताप यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांनी या नियोजित हॉस्पिटलची पाहणी केली. कार्यक्रमात आशासेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य विभाग विस्तार अधिकारी बिराजदार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, दी यश फाउंडेशनचे विश्वस्त हेमचंद्र माने, विश्वस्त माधवी माने, विश्वस्त मिहीर माने, शिवानी माने, सतीश इंगवले, शारदा इंगवले, अमेय इंगवले, अभिज्ञा इंगवले, कांचन सावंत, विरंची माने, रजिस्ट्रार शलाका लाड, सहरजिस्ट्रार मानसी मुळ्ये, प्र. प्राचार्य चेतन अंबुपे, अपेक्षा आंबवकर, पांडुरंग पाचकुडे, दीपक घवाळी आणि बाबा कीर, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. शिरसाट, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. चौगुले, हातखंबा पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका माने, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. सुतार, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, डेरवणचे वालावलकर रुग्णालयाचे १२ डॉक्टर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.