-दिव्यांगांसाठी रविवारी चिखलीत शिबिर
दिव्यांगांसाठी रविवारी चिखलीत शिबिर
चिपळूण, ता. ४ ः दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबिर ९ मार्चला सकाळी १० वाजता तालुक्यातील चिखली येथील ओमकार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
कोकण भूमिपुत्र व स्कॉन उद्योगसमुहाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश शंकरराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून स्कॉन प्रो फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि शं. ना. चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे शिबिर घेण्यात येणार आहे.
शिबिराच्या उद्घाटनाला गुहागर तहसीलदार परिक्षित पाटील, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड उपस्थित राहणार आहेत. शिबिरापूर्वी नोंदणी आवश्यक आहे. दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत पिकअप् व्यवस्था सकाळी ९ ते ११ या वेळेत गुहागर बसस्थानक व मार्गताम्हाणे बसथांबा येथून उपलब्ध करण्यात आली आहे तसेच शिबिरस्थळी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

