

४९१४३
शिवरायांचा पुतळा उभारणीस प्रारंभ
शिल्पकार सुतारांकडून विधिवत पूजा ः ‘राजकोट’मध्ये ‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : येथील किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून राम सुतार आर्टस् क्रिएशन या राष्ट्रीय स्तरावरील कंपनीमार्फत सुरू आहे. पुतळ्यासाठी चौथरा उभारणी पूर्ण झाल्यानंतर महाराजांचा पुतळा उभारणीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. शिल्पकार अनिल सुतार यांनी चौथऱ्यावर विधिवत पूजा केल्यानंतर पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज खडकावर उभे असल्याचे दाखविले असून, याच खडकाचे भाग सर्वप्रथम चौथऱ्यावर क्रेनच्या साहाय्याने ठेवले.
पुतळ्यासाठी चौथरा बांधल्यानंतर शिवजयंतीदिनी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे आदींच्या उपस्थितीत पायाभरणी करण्यात आली. शिल्पकार अनिल सुतार यांच्या हस्ते आणि आरवली सोन्सूरे येथील शिवचैतन्य आजोबा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौथऱ्यावर पुतळा उभारणी होत असताना विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच काम करणारे कारागीर उपस्थित होते. यावेळी मोठ्या क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याचा बेस असलेला तयार केलेला ब्राँझचा खडक चौथऱ्यावर बसविण्यात आला.
वाऱ्याच्या प्रभावाबाबत
ऑस्ट्रेलियात चाचपणी
पुतळ्यासाठी उत्तम दर्जाचे ब्राँझ व स्टील वापरले आहे. त्यामुळे हा पुतळा अनेक वर्षे टिकणारा असेल. हा पुतळा समुद्र किनारी असल्याने वाऱ्याचा प्रभाव पाहता या पुतळ्याची ‘विंड टनेल टेस्ट’ ऑस्ट्रेलिया येथे केली असून त्याचे सकारात्मक निकाल आले आहेत. महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी स्वरूपातील हा सर्वात उंच पुतळा आहे, असे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.